न्हावेली / वार्ताहर
Free camp completed under PM Kisan Samman Nidhi Yojana!
शनिवार 8 रोजी मळगाव येथे जिल्हा बँकेच्या वरील हॉल मध्ये सकाळी 10 ते 6 या वेळेत पी एम किसान सन्मान निधी योजना नवीन लाभार्थी यांचे फॉर्म भरणे, कोणाचे हफ्ते जमा होत नसतील तर त्रुटी दूर करणे यासाठी मोफत शिबिराचे आयोजन बाप्पा नाटेकर व त्यांच्या मित्रंमंडळातर्फे करण्यात आले होते.
यावेळी पी एम किसान योजनेचे काम पाहणारे संतोष कांबळे, डाटा ऑपरेटर सुनील गावडे, सुंदर सावळ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते संजय नाटेकर यांनी या कॅम्प साठी आपला हॉल मोफत देवून सहकार्य केले. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सिद्ध्येश तेंडोलकर, तुषार वालावलकर यांनी विशेष मेहनत घेतली. आपल्या मंडळाचे काम असेच भविष्यात चालू राहणार असून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर लवकरच आयोजित करण्यात येईल असे बाप्पा नाटेकर यांनी सांगितले.