दाणोली आणि चौकुळ येथे तलाठयांचे मार्गदर्शन
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी येथे तलाठी भरती पदासाठी इच्छुक उमेदवारांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले. ज्ञानसिंधु प्रबोधिनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन कार्यशाळेत दाणोली तलाठी सचिन चितारे आणि चौकुळ तलाठी प्रवीण पोले यांनी तलाठी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.
यावेळी सचिन चितारे आणि चौकुळ महेश पोले यांनी तलाठी भरतीबाबतच्या अडचणी आणि समस्यावर मात कशी करायची यावर उपाय सुचविले. तसेच तलाठी भरतीसाठी अभ्यास कसा करावा? प्रश्नपत्रिका स्वरूप कशाप्रकारे असेल तसेच कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागेल या सर्व गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञान सिंधु प्रबोधनीचे शिक्षक श्री रेडकर यांनी तलाठी सचिन चितारे व तलाठी महेश पोले आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना वेळात वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.