प्रतिनिधी /बेळगाव
मडगाव येथील राष्ट्रीय मातृशक्ती गोवा यांच्यावतीने आयोजित महिलांच्या प्रशिक्षणावेळी बेळगावच्या तरुणांनी शिवकालीन युद्धकला सादर केल्या. दांडपट्टा, लाठीमेळा, तलवारबाजी आदी कलांची माहिती देत महिला व युवतींना प्रशिक्षण देण्यात आले.
राष्ट्रीय मातृभूमी गोवा संघाच्यावतीने महिलांसाठी भव्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 500 हून अधिक युवतींचा समावेश होता. ‘भारत माता की जय’ संघाचे संचालक सुभाष वेलिंगकर, प्रवीण नेसवणकर, गणेश गावडे, नितीन फळदेसाई आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी बेळगाव येथील शिवनिश्चय तालीमच्या सदस्यांना बोलाविण्यात आले होते. तालीमचे संचालक सूरज बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. त्यांच्यासोबत शण्मुख चंदगडकर, अभी लोहार, कृष्णा जाधव यांनी विविध युद्धकला सादर केल्या.