वृत्तसंस्था /मुंबई
भारताच्या इंधन मागणीमध्ये सप्टेंबरमध्ये घट दिसून आली आहे. सदरची घट ही 10 महिन्यानंतर सर्वात कमी असल्याची माहिती आहे. नोव्हेंबर 2021 नंतर ही इंधनाची मागणी कमी नोंदली गेली असल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑगस्टच्या तुलनेमध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये इंधनाची मागणी 3 टक्क्यांनी कमी राहिली आहे.
आगामी काळात होणार वाढ
गेल्या महिन्यात भारतात इंधनाची मागणी तुलनेने कमी राहिली असली तरी येत्या काळात ती वाढेल, असा तज्ञांचा होरा आहे. आगामी काळामध्ये इंधनाच्या मागणीमध्ये भारतामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.
किती झाली विक्री
सप्टेंबरमध्ये 17.18 दशलक्ष टन इंधनाची मागणी राहिली आहे. वर्षाच्या आधी याच महिन्यात ही मागणी 15.89 दशलक्ष टन इतकी होती. डिझेलची विक्री वर्षाच्या आधारावर पाहता 13 टक्के वाढीसह 6.26 दशलक्ष टनवर पोहोचली आहे. पेट्रोलची विक्री 8.8 टक्के वाढीसह 2.83 दशलक्ष टनवर राहिली आहे. याचसोबत एलपीजीची विक्री 3.5 टक्के वाढून 2.45 दशलक्ष टनवर सप्टेंबरमध्ये पोहोचली आहे.