सन 2023 -24 अंतर्गत माननीय ना.श्री. दीपक भाई केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा यांनी सुचवलेल्या दांडेली ग्रामपंचायत बहुउद्देशीय सभागृह विस्तारीकरण करणे या कामासाठी 8.00 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदर मंजूर कामाचे पत्र सरपंच श्री निलेश आरोलकर यांच्याकडे, ग्रामपंचायत सदस्य सौ उमा पांगम,माजी सरपंच तथा शिवसेना गटप्रमुख श्री संजय पांगम, शाखाप्रमुख श्री तानाजी खोत, श्री विजय नाईक यांनी सुपूर्द केले. सदर काम होण्यासाठी श्री. संजय पांगम, उमा पांगम, श्री.तानाजी खोत श्री बाळा मोरजकर यांनी पाठपुरावा केला.
तसेच काम मंजूर होण्यासाठी जिल्हाप्रमुख श्री.अशोक दळवी, तालुकाप्रमुख श्री नारायण उर्फ बबन राणे स्वीय सहाय्यक श्री. गजानन नाटेकर, विभाग प्रमुख श्री. बाळा शिरसाट यांनी विशेष सहकार्य केले.दांडेली ग्रामपंचायत इमारत ही माननीय श्री दीपक भाई केसरकर यांच्या सहकार्यातूनच उभी राहिलेली आहे. तसेच त्यांच्या सहकार्याने ती पूर्णत्वास येत आहे याबाबत उपस्थितांकडून सर्व ग्रामस्थांच्या वतीने माननीय श्री दीपक भाई केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.