सावंतवाडी प्रतिनिधी
युवक काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी आजगावचे गजानन टक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली आहे. सावंतवाडी तालुक्यात युवक काँग्रेसची फळी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने श्री टक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबाबत तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी अभिनंदन केले आहे.