शिरोळ प्रतिनिधी
Kolhapur Shirol News : लोप पावत चाललेल्या कुस्ती खेळाला चांगले दिवस आले असून या खेळामध्ये गावाचे तालुक्याचे राज्याचे देशांमध्ये नाव कमवा त्यास आपण लागेल ते मदत करू अशी काही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली
येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत शिदनाळे (दतवाड) यांचे सुपुत्र पैलवान शुभम सिद्धनाळे हे उपमहाराष्ट्र केसरी उपविजेता व खेलो इंडिया मध्ये काशयपदक मिळवल्याबद्दल कारखान्याच्या कार्यस्थळावर गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते
पैलवान शुभम सिद्धनाळे यांचे शिक्षण बीए शिवराय महाविद्यालय गडहग्लज येथे झाले असून शिवराम दादा तालीम गणेश पेठ पुणे या ठिकाणी ते तालीम करीत आहेत ,पैलवान चंद्रकांत कटके व अभिजीत कटके या वस्तादाचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे त्यांने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत रोप्य पदक, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत कास्यपदक, सीनियर नॅशनल कुस्ती यासह अन्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्याने अनेक नामांकित कुस्त्या मध्ये भाग घेऊन विजय संपादन केला आहे दत्तवाड सारख्या ग्रामीण भागात शुभम सिद्धनाळे हा कुस्तीपटू म्हणून नावारूपास आला आहे यावेळी कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे शेखर कलगी चंद्रकांत सिद्धनाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.