वार्ताहर/ कुडाळ
ए. एल.इ. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट विद्यालयाला पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्ञानेश सामंत यांनी दहा लॅपटॉप भेट दिले.विद्यालयाच्या ऑनलाईन कामकाजात वाढ झाल्यामुळे प्रत्येक परीक्षा कार्यालयीन कामकाज ऑनलाईन करावे लागते. शाळेची गरज ओळखून श्री. सामंत यांनी विद्यालयाला दहा लॅपटॉप भेट दिले.
सामंत यांनी संपूर्ण शाळेची पाहणी केली . शालेय विविध उपक्रमांची देवदत्त साळगावकर व पर्यवेक्षक राजन हंजनकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यापुढेही आपण आवश्यक ती मदत विद्यालयाला करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्तात्रय उर्फ प्रविण ठाकुर, संस्था पदाधिकारी राजेश सामंत विद्यार्थी उपस्थित होते.संस्था संचालक देवदत्त साळगावकर यांनी आभार मानले