बेळगाव : लोककल्प फाउंडेशनने चापोली गावातील सरकारी शाळेला क्रिकेट सेट, लगोरी आणि 34 लिटरचा स्टील वॉटर फिल्टर भेट दिला. क्रिकेट सेट, लगोरी आणि 34 लिटरचे स्टील वॉटर फिल्टर दान केल्याने विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. लोकमान्य सोसायटीने लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. लोकमान्य संस्था इतर स्वयंसेवी संस्थांसोबत नियमितपणे सामाजिक उपक्रम राबवत असून या योगदानामुळे चापोली गावातील रहिवाशांसाठी आरोग्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. लोककल्प फाऊंडेशन सेवा देत असल्याने ग्रामस्थांना त्याचा लाभ होत आहे. या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी लोककल्प फौंडेशन व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीला धन्यवाद दिले.
Previous Articleसरकारी योजनांच्या लाभासाठी महिला-विद्यार्थ्यांच्या रांगा
Next Article कृतिशील व्हा; संधिवात नियंत्रित करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.