Glowing Skin Care Tips : चमकदार चेहरा मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. अनेक महागडे पदार्थ बाजारातून खरेदी करत असतो. पण कधी-कधी तात्पुरता उपयोग होतो. खोलवर त्याचे परिणाम जाणवत नाहीत. पुन्हा दुसरे प्रोडक्ट खरेदी करतो. घरगुती उपाय करतो मात्र सगळ वाया जातं. यासाठी आहारात बदल करून बघा. शरीरात अंतर्गत बदल केल्यानंतर चेहरा आपोआपच सुधारायला लागतो. यासाठी डिटॉक्स ड्रिंक्स तुम्हाला फायदेशीर ठरतील. कारण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास या ड्रिंक्सची मोठी मदत होते. चला तर मग जाणून घेऊया कोणते डिटॉक्स ड्रिंक तुमच्या त्वचेला आतून चमक देईल.
व्हिटॅमिन सी फळे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. आल्याचा रस संत्र्याच्या रसात मिसळून तुम्ही डिटॉक्स पेय तयार करू शकता. हे त्वचेला टवटवीत करण्यास मदत करेल.
लिंबूवर्गीय फळांचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. परंतु लिंबूवर्गीय फळे हे व्हिटॅमिन सीचे एकमेव स्त्रोत नाहीत. टोमॅटोचा रस प्यायल्याने त्वचाही आतून स्वच्छ होते.
बीटरूटचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर या रसात बदाम टाकल्याने व्हिटॅमिन ई देखील मिळते. त्यामुळे त्वचेचे टॅनिंग आणि सनबर्न कमी होते. डिटॉक्स ड्रिंक्समध्ये तुम्ही बीटरूट आणि बदामाचा रस देखील अॅड पिऊ शकता.
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. त्याचबरोबर शरीरातील टॉक्सिन्सही बाहेर पडतात. चेहऱ्यावर पिंपल्स तुम्हाला त्रास देत असतील तर हे ड्रिंक नक्की घ्या.
शरीराच्या पोषणासाठीही गाजराचा रस खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए समृद्ध गाजराच्या रसामध्ये हळद देखील घालता येते. आपण आहारात सफरचंदाचा रस देखील समाविष्ट करू शकतो. ही सर्व पेये त्वचेला नैसर्गिक चमक देतात. ज्यामुळे त्वचेवरील मुरुम आणि मुरुमांपासून सुटका मिळते.