ट्रिपल कॅमेरासेटपसह मिळणार अत्याधुनिक सुविधा : किंमत 1.55 लाख रुपये
नवी दिल्ली
जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे अधिकृत सर्च इंजिन म्हणून गुगलची ओळख आहे. परंतु गुगल आता आपली नवनवीन उत्पादनेही बाजारात आणत आहे. यामध्ये आता गुगलने आपला अधिकृतपणे असा पहिला फोल्ड करण्यायोग्य फोन, ‘पिक्सेल फोल्ड’ याचे नुकतेच अनावरण केले आहे.
गुगलने अद्याप नवीन ‘पिक्सेल फोल्ड’चे स्पेसिफिकेशन्स आणि किमती जाहीर केल्या नाहीत. गुगलने ट्विटरवर ‘मे द फोल्ड बी विथ यू’ या वाक्यासह व्हिडिओ टीझर पोस्ट केला आहे. यासोबतच गुगलने असेही म्हटले आहे की डिव्हाइस 10 मे रोजी गुगलने आय/ओ इव्हेंटमध्ये लॉन्च केले जाईल.
याची किंमत 1.55 लाख असू शकते.
एक नवीन व्हिडिओमधून ‘गुगल पिक्सेल फोल्ड’ ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येणार असल्याची माहिती आहे. तिसरी लेन्स पेरिस्कोप लेन्स आहे, जी सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रामध्येमध्ये देखील आढळते. सीएनबीसीच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की या फोनची किंमत गॅलेक्सी झेड फोल्ड 4 सारखीच राहणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
गुगलचा फोन 1.55 लाख रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
नवीन फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. तिसरी लेन्स पेरिस्कोप लेन्स आहे.
नवीन फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल.5.8-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे.
7.6-इंचाचा टॅबलेटसारखा डिस्प्ले असू शकतो.या आठवड्याच्या सुरुवातीला, गुगलने देखील घोषणा केली की ते भारतात एक नवीन पिक्सेल डिव्हाइस लॉन्च करेल. यामध्ये ‘पिक्सेल 7ए’ असू शकते.