तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडी शाखेतर्फे आयोजन, मुलींच्या गटात स्नेहल तोराळकरची बाजी
वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा येथील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडी शाखेतर्फे खास दसरोत्सवानिमित्त आयोजित खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत मुरकुटवाडी येथील गोपाळ भालेकरने बाजी मारली तर मुलींमध्ये खुल्या गटात धुमडेवाडीच्या स्नेहल तोराळकर हिने बाजी मारली. गावमर्यादित स्पर्धेत मंथन नाईक व निकिता पावशे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील ग्रामदेवता लक्ष्मी मंदिराजवळ माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते निशाण दाखवून खुल्या मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील यांच्या हस्ते गावमर्यादित स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धा खुला गट, गावमर्यादित व ज्येष्ठांचा गट अशा तीन विभागात घेण्यात आल्या. खुल्या गटात मुलांमध्ये गोपाळ आलेकर (मुरकुटवाडी), आनंद पाटील, परशराम कोळागी (तुम्मरगुट्टी), परशराम नाईक (दाटे), संभाजी नाईक (कार्वे) तर मुलींमध्ये खुल्या गटात स्नेहल तोराळकर (धुमडेवाडी), अर्पिता देसाई (दाटे), राधिका नाईक (हलकर्णी), नम्रता हावळे (उचगाव) व मधुरा गावडे (धुमडेवाडी) यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकाविले.
गावमर्यादित स्पर्धेत मुलांमध्ये मंथन नाईक, आशिष अगसगेकर, जीवन सालगुडे, संकेत सांगावकर, साई गोजगेकर. तर मुलींमध्ये निकिता पावशे, शुभांगी कंग्राळकर, स्नेहल पावशे यांनी क्रमांक पटकाविले. ज्येष्ठांच्या गटात चंद्रकांत कडोलकर, सुरेश सांगावकर व धोंडिराम शिंदे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले.
जवान रवी अगसगेकर, संस्कृती नारायण अगसगेकर, मंथन विनोद नाईक, पुंदन किशोर कडोलकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव ग्रामीण महिला सोसायटी व कॅप्टन चंद्रकांत कडोलकर, विजेता स्पोर्ट्सच्या सौजन्याने बक्षिसे देण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर, यल्लाप्पा काकतकर, युवा आघाडीचे विनायक पावशे, उपाध्यक्ष नागेश किल्लेकर, उदय नाईक, सतीश नाईक, अर्जुन जकाने, सुनील अगसगेकर, दिनेश किल्लेकर, अरुण कुडचीकर, बाळू सांगावकर, संदिप मोटे, अनिल हेगडे, मल्लाप्पा देवगेकर, मोहन नाईक, परशराम कुडचीकर, बाळू कुडचीकर, पॅप्टन चंद्रकांत कडोलकर, विनोद नाईक, चंद्रकांत अगसगेकर, नारायण अगसगेकर, संतोष मंडलीक, श्रीकांत जाधव, राजू कुप्पेकर, परशराम साळुंखे, मोहन पावशे, युवराज अगसगेकर आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.