सरपंच जामदार,पांडूरंग राउळ,उदय जामदार व गजानन सातार्डेकर यांच्या प्रयत्नांना यश…
न्हावेली / वार्ताहर
मळगाम हायवेवर उड्डाणपूलासाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे सरकारकडून हिरवा कंदिल सरपंच स्नेहल जामदार,पांडूरंग राउळ,उदय जामदार व गजानन सातार्डेकर यानी मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेउन चार कामांची मागणी केली होती त्यापैकी मळगाव बाजारपेठेतील सस्त्याचे काम पुर्ण झाले असून मडवळ टेंब ते झाराप पत्रादेवी हायवेचे काम प्रकतीपथावर असतांना अजून एका कामाला हिरवा कंदिल मिळाला आहे. 66 नं.हायवेला रवळनाथ मंदिर ते केॅद्रशाळा मळगाव हा रस्ता उड्डाण पुलामूळे जोडला जाणार असून हायवेवरील होणार्या अपघातांना आळा बसणार आहे.शिवाय शेतकर्यांना शेतीसाठी गुरे नेणे तसेच शाळकरी मुलांसाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे..सदर काम मंजूर होण्यासाठी पांडूरंग राउळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मत सरपंच स्नेहल जामदार यांनी मांडले..तसेच काम लवकर पुर्ण होण्यासाठी गजानन सातार्डेकर व उदय जामदार सातत्याने प्रयत्न करीत आहेत.गावात राजकारणापेक्षा मी सरपंचाच्या खुर्चीत असे पर्यंत समाजाच्या विकासाला नेहमीच प्रधान्य देईन त्यासाठी मळगाव वासीयांचे नेहमीच सहकार्य लाभते या सर्वांच्या आशिर्वादानेच मी एवढी विकासकामे मंजूर करू शकले..
६६ नं. हायवे वरील उड्डाणपूलासाठी मुख्यमंत्री महोदयांना 18 नोव्हेंबर 2022 रोजी मागणी पत्र दिले होते.त्याची दखल घेउन शासनाकडून 26 मे 2023 मुख्य अभियंता राष्ट्रिय महामार्ग याना पत्र पाठवले असून काम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याच बरोबरसमळगाव बाजारपेठ ते मायापूर्वाचारी मंदिरकडे जाणार्या रस्त्याला उड्डाणपूलाची मागणी केली असून तेही काम लवकरच मंजूर होईल असे मत सरपंच मळगाव यांने मांडले.