बेंगळुर: कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या कारचालकाचा बेंगळुरू येथील केम्पेगौडा विमानतळावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
काल रात्री उशिरा कारचालक रविकुमार एस काळे हे राज्यपालांना घेण्यासाठी विमानतळावर आले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका जाणवला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात येत होते, परंतु वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.