प्रतिनिधी /म्हापसा
श्रीगणेश विद्यामंदिर सभागृह, गणेशपुरी, म्हापसा येथे रविवार 24 जुलै रोजी सकाळी 9 वा. गुरुवर्य कै. पं. प्रभाकर गोविंद च्यारी शिष्य परिवार व पं. प्रभाकर च्यारी प्रतिष्ठान प्रस्तुत ताल प्रभाकर एक तेजोमय अनुभव पुरस्कृत ‘गुरु वंदना’ हा कार्यक्रम होणार आहे.
च्यारी मास्तरांच्या आठवणी जागविण्यासाठी आणि आपल्या जीवनात त्यांचे स्थान कायम रुजविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात संदीप भरणे (तबला एकलवादन), नितीन कोरगांवकर (तबला एकलवादन), अमित भोसले व कु. स्वस्तिक नाईक शिरोडकर (तबला सहवादन), नंदिनी च्यारी (सितार वादन), डॉ. राजेश भटकुर्से, डॉ. साईश देशपांडे, अमर मोपकर व गीतेश मांद्रेकर (तबला सहवादन), नगमासाथ कु. सृजन भटकुर्से, मालू गांवकर व प्रसाद गावस. तबलासाथ प्रथमेश च्यारी आदी कलाकारांचा सहभाग असेल, तर निवेदन स्वाती नाईक यांचे असेल.