ऑनलाईन टीम / बीजिंग :
‘H10N3’ बर्ड फ्लूचा प्रथमच माणसाला संसर्ग झाल्याची नोंद चीनच्या जिआंगसू प्रांतात झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.
जिआंगसू प्रांतातील झिंजियांग येथील एका 41 वर्षीय व्यक्तीमध्ये H10N3 बर्ड फ्लूचा संसर्ग दिसून आला आहे. कुक्कुटपालनामुळे हा बर्ड फ्लू पसरला आहे. 28 एप्रिल रोजी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला ताप आणि इतर लक्षणे दिसून आली. एका महिन्यानंतर, 28 मे रोजी, या व्यक्तीला H10N3 बर्ड फ्लूची पुष्टी झाली. या बाधित व्यक्तीची प्रकृती ठीक असून, लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
आतापर्यंत H10N3 बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाची नोंद जगात कुठेही झाली नाही.