वार्ताहर /धामणे
धामणे, कुरबरहट्टी येथील कुरबर समाजाच्यावतीने हालसिद्धेश्वर यात्रा भंडाऱ्याच्या उधळणीत आणि ढोलांच्या गजरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पार पडली. दि. 20 रोजी हालसिद्धेश्वर मंदिरात सकाळी देवाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंदिरमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री धार्मिक गाण्यांचा कार्यक्रम उत्साहाने पार पडला. या गाण्याच्या कार्यक्रमात पंचक्रोषीतील व महाराष्ट्रातील भाविकांनी भाग घेतला होता. रविवार दि. 21 रोजी सकाळपासून हालसिद्धेश्वर देवाच्या पालखी सोहळ्याची ढोलाच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत भव्य मिरवणूक कुरबरहट्टी व धामणे गावात फिरुन दुरापी 3 वाजता मंदिर आवारात महाप्रसादाचे वाटप करण्यात येवून कार्यक्रमाची सांगता झाली.