आयफेल टॉवरसमोर घातली लग्नाची मागणी
अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. तिने विवाहापूर्वी स्वतःचा होणारा पती सोहेल कथुरियाची ओळख चाहत्यांना करून दिली आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या ड्रीमी प्रपोजलची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये सोहेल हा पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज करताना दिसून येतो. दोघांची रोमँटिक छायाचित्रे पाहून अनेक कलाकारांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोहेलने आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून हंसिकाला लग्नाची मागणी घातली आहे. हंसिका आणि सोहेल हे मेणबत्त्या आणि गुलाबांदरम्यान स्वतःच्या प्रेमाची कबुली देताना दिसून येतात. हंसिका आणि सोहेल यांची छायाचित्रे पाहून वरुण धवन, ईशा गुप्तापासून अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱया हंसिकाला शाका लाका बूम बूम या कार्यक्रमाद्वारे ओळख मिळाली. हंसिका मोटवानी 4 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहे. हंसिका आणि सोहेल हे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जयपूर येथील 450 वर्षे जुन्या मुंडोता किल्ल्यात विवाहबद्ध होणार असल्याचे समजते. सोहेल हा उद्योजक असून तो हंसिकासोबत मिळून इव्हेंट प्लॅनिंग कंपनी चालवत आहे.