प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य श्रीराम मंदिर, गाडेमार्ग, आचार्य गल्ली, शहापूर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे 5 वाजता चिदंबर ग्रामोपाध्याय भटजी यांनी पूजाअर्चा केली.
यावेळी रेखा जाधव, रेणुका मेलगे, भागुणी माने, खोताबाई माळवी यांनी हनुमान जन्मोत्सवाचा पाळणा म्हटला. कार्यक्रमाला संध्या कालकुंद्रीकर, प्राची मेलगे, अर्पिता देशपांडे, कल्याणी कालकुंद्री, स्वाती हलगेकर, रोहिणी रेडेकर, माधुरी भेकणे, शांता चव्हाण, अनिता शिगेहळ्ळी, सायली कालकुंद्रीकर, सेवेकरी सुधीर कालकुंद्रीकर, शेखर हंडे, हभप ज्ञानेश्वर कलाकते, रवि शिगेहळ्ळी, विलास कुट्रे, शंकर आदी भक्तमंडळी उपस्थित होती.