मालवण /प्रतिनिधी –
बारावी परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम आलेली टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी हर्षिता पांडुरंग ढोके हिचा सिंधुदुर्ग जिल्हा गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, जिल्हा नियोजन सदस्य हरी खोबरेकर, पर्यटन महासंघ जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, गाबित समाज पतसंस्था संचालक स्वप्नील आचरेकर, मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणी खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य दादा वाघ, नरेश हुले, दीक्षा ढोके तसेच बाबी जोगी उपस्थित होते. हर्षिताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.