बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक कॉलेजतर्फे खानापूर तालुक्यातील आमटे गावात नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने सीएसआर उपक्रमांतर्गत फौंडेशनतर्फे हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 57 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. रजत ठाकुर, डॉ. सेजल माणकोजी, डॉ. ओमशिवा, गलीपल्ली यांनी रुग्णांची तपासणी केली. पीआरओ श्रीधर के. तसेच लोककल्पचे किशोर नाईक, अनंत गावडे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
Previous Articleसांबरा महालक्ष्मीदेवी यात्रेची आज सांगता
Next Article निर्बंधित जंगलक्षेत्रात पर्यटकांचा वावर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.