प्रतिनिधी / बेळगाव
ज्ञानदीप स्कूल, येळ्ळूर-वडगाव यांच्या सौजन्याने अन्नपूर्णेश्वरीनगर, येळ्ळूर रोड, वडगाव येथे झालेल्या मोतिबिंदू आणि शुगर तपासणी शिबिरात 250 स्त्राr-पुरुषांनी भाग घेतला. त्यामध्ये 22 जणांना मधुमेह व 31 जणांना मोतिबिंदू असल्याचे आढळून आले. त्यांना उपचाराचा सल्ला देण्यात आला.
या शिबिरासाठी बिम्स हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र बाळीकाई, स्टाफ नर्स रेश्मा गावडे, बसवराज कळसण्णावर, लॅब टेक्निशियन चंद्रशेखर चंदरगी यांनी पुढाकार घेतला. यावेळी डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. शिबिराला मदन कुडुचकर, पोळ, अंगणवाडी कार्यकर्त्या व वडगाव हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.