अरगा येथे महिलेचा बळी : सर्वत्र पाणीच पाणी, केएसआरटीसी बस डेपोला तलावाचे स्वऊप; सिटीबस सेवा सकाळच्या सत्रात ठप्प
कारवार : जिल्ह्याची किनारपट्टी हवामान खात्याने वर्तविलेल्या रेड अलर्टमधून बाहेर पडून ऑरेंज अलर्ट मधून वाटचाल करीत आहे. त्यामुळे बुधवारीही किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. दरम्यान, कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरगा येथे 75 वर्षीय महिलेने जोरदार पावसामुळे आपला जीव गमावला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसामुळे किनारपट्टीवरील तालुक्यातील हा दुसरा बळी आहे. मृत महिलेचे नाव तारामती नाईक असे आहे. कारवार तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे नाईक यांच्या घरासमोरील अंगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यात पडून तारामती नाईक यांनी जीव गमावला आहे. किनारपट्टीवर कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे किनारपट्टी प्रदेशाला चक्रीसमुद्राचे स्वऊप प्राप्त झाले आहे. समाधानाची बाब म्हणजे घाटमाथ्यावरील सिद्धापूर तालुक्यातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तथापि जोयडा, दांडेली, हल्याळ, मुंदगोड, शिरसी आणि यल्लापूर या तालुक्यात पावसाने अद्याप जोर धरलेला नाही.
कारवार तालुक्यात मंगळवारी दुपारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारवार शहरातील अनेक प्रदेश जलयम झाले आहेत. कारवार आणि शिरवाड रेल्वेस्थानक दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. शिवाय येथील हब्बूवाडा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. हब्बूवाडा येथे असलेल्या केएसआरटीसी बस डेपोला मोठ्या तलावाचे स्वऊप प्राप्त झाले आहे. डेपो प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धर्मस्थळसह अन्य लांबपल्याच्या बसेस वेळेत धाऊ शकल्या नाहीत. बस डेपोमधील साहित्याची पावसाच्या पाण्यामुळे हानी झाल्याचे सांगण्यात आले. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली असे सांगण्यात आले. बस डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येथील सिटीबस सेवा सकाळच्या सत्रात ठप्प झाली होती. बसडेपोसह कारवार शहरात ठिकठिकाणी पाणी साचायला नगरसभेचा कारभार जबाबदार धरला जात आहे. नगरसभेने वेळेत गटारी स्वच्छ करण्याचे काम न केल्याने ही परिस्थिती ओढवली असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
इडूर येथे घरात पाणी घुसण्याचा धोका
कारवार तालुक्यातील चंडिया ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील इडूर येथे घरामध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. सी-बर्ड नाविक दलाच्या बांधकामाचा इडूर ग्रामस्थांना फटका बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवार तालुक्यातील अरगा येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर किरकोळ स्वऊपाच्या दरडी कोसळल्याची घटना घडली आहे. हमरस्त्यावर पाणी साचायचे आणि दरडी कोसळण्याचे मुख्यकारण हमरस्त्याचे ऊंदीकरण करणारी आयआरबी कंपनी असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात चोवीस तासात 907 मि.मी. पावसाची नोंद
बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 907 मि.मी. पावसाची नेंद झाली. यावर्षीच्या पावसाळ्यातील ही सर्वात अधिक नेंद आहे. तालुकानिहाय पावसाची नेंद अशी (आकडेवारी मि. मी. मध्ये) अंकोला 71, भटकळ 184, दांडेली 23, हल्याळ 16, होन्नावर 177, कारवार 178, कुमठा 118, मुंदगोड 18, सिद्धापूर 55, शिरसी 23 आणि यल्लापूर 26.