नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला असून 130 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यासोबतच या ड्रग रॅकेटशी संबंधित एका अफगाण नागरिकासह 4 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला असून देशव्यापी कारवाईत 21.4 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केले असल्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी शनिवारी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थ साठय़ाची किंमत अंदाजे 130 कोटी रुपये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या ड्रग तस्करी रॅकेटशी संबंधित अन्य संशयितांना तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे.