जिल्हा परिषदेच्या विविध योजनेत 4 हजार 325 शेतकऱयांना मिळाला लाभ
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मदतीचा हात दिला आहे. मागील वर्षभरात 4 हजार 122 लाभार्थींची विविध योजनांसाठी निवड करून त्यांना 2 कोटी 90 लाख 69 हजार 883 रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी 203 लाभार्थींची निवड करून त्यांना 1 कोटी 5 लाख 15 हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. प्रतिवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात योजनेंचा लाभ देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सेस फंडातून शेतकरीहिताच्या विविध योजना त्याचप्रमाणे जिल्हा योजना समितीतूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा योजना राबविल्या जातात. लाभार्थींकडून अर्ज मागवून कागदपत्रांची पडताळणी करून लाभार्थींची निवड करण्यात येते. मार्च 2020 पासून सलग दोन वर्षे कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय अडचणीत आले. त्यामुळे शेतकऱयांना हातभार लागावा म्हणून ही मदत देण्यात आली.
राबविण्यात आलेल्या योजना
जिल्हय़ात 400 लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात कडबाकुट्टी यंत्रे देऊन त्यांना 49 लाख 98 हजार 460 रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. 400 शेतकऱयांना ताडपत्री सवलतीच्या दराने देऊन 10 लाख रूपयांचे अनुदान, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देत कृषी विभागाने 225 शेतकऱयांना 11 लाख 25 हजार रूपयांचे अनुदान वितरीत केले. विविध प्रकारची सुधारित संकरित बियाणे उपलब्ध करून देण्यास 33 लाख 20 हजार 61 रूपयांचे अनुदान दिले.
त्याचबरोबर जिल्हय़ात 663 शेतकऱयांना बॅटरी ऑपरेटेड स्पे पंपासाठी 14 लाख 35 हजार 750 रूपये, 1 हजार 9 शेतकऱयांना सवलतीच्या दरात कोळपी पुरवून 7 लाख 54 हजार 787 रूपयांचे अनुदान वितरित करण्यातआले आहे. तसेज जिल्हय़ात 267 लाभार्थींना अनुदानावर पाच एचपी विद्युत पंपासाठी 26 लाख 72 हजार 730 रूपयांचे अनुदान, 33 लाभार्थींना 3 एचपी विद्युत पंपासाठी 2 लाख 80 हजार 500, 69 लाभार्थींना 5/4 एचपी डिझेल इंजिनसाठी 6 लाख 89 हजार 750 रूपये अनुदान, 602 शेतकऱयांना एचडीपीई पाईप पीव्हीसी पाईपसाठी 35 लाख 95 हजार 105 रूपयांचे अनुदान, 20 शेतकऱयांना रोटर टिलर व औजारांसाठी 9 लाख्घ 98 हजार रूपये अनुदान, 88 शेतकऱयांना रोटावेटरसाठी (ट्रक्टर ऑपरेटेड) 26 लाख 12 हजार 200, विविध प्रकारची यंत्रे शेतकऱयांना देऊन त्यासाठी 48 लाख 69 हजार 872 रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
त्याचबरोबर 203 लाभार्थींची निवड करून त्यांना विहीर खुदाई, दुरूस्ती, विद्युत पंप संच, ठिबक सिंचन, वीज जोडणी आकार यासाठी 1 कोटी 5 लाख 15 हजार रूपयांचे अनुदान वर्षभरात देण्यात आलो आहे. बिरसा मुंडा योजनेंतर्गत ही लाभार्थींची निवड करून त्यांना लाभ देण्यात आला. 1 वर्षभरात 3 कोटी 95 लाख 85 हजार रूपयांचे अनुदान शेतकऱयांना वितरित करण्यात आले आहे.