ग्लॅमर क्वीन करते नौकेतून शिकार
जगात काही लोक स्वतःच्या छंदाच्या आड कुणालाच येऊ देत नाहीत. अशाच लोकांपैकी एक आहे अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहणारी सारा स्नीडल. सर्वसाधारणपणे पुरुषांना असणारा छंद तिला जडला आहे. सारा सागरी जीवांना पकडण्यास उत्सुक असते आणि मागील काही वर्षांमध्ये तिने या क्षेत्रात स्वतःच ओळख तयार केली आहे.
साराने आतापर्यंत समुद्रातून वेगवेगळय़ा प्रकारचे जीव-जंतू पकडले आहेत. कायक म्हणजेच नौकेत बसून ती मासेमारी करत असल्याने तिला फिशिंग क्वीन म्हटले जाते. एवढेच नव्हे तर तिला सारा सॉल्क असे टोपणनाव देखील मिळाले आहे.
साराने 2017 पासून स्वतःच्या फिशिंग ट्रिप्स आणि त्याच्याशी संबंधित ऍडव्हेंचरला रिकॉर्ड करणे आणि त्याला स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांसाठी शेअर करण्यास सुरुवात केली होती. सारा सॉल्टने मासेमारीला ग्लॅमरस स्वरुप प्राप्त करून दिले आहे. मासे पकडणे आणि जलीय प्राण्यांसोबत राहणे आव्हानात्मक असण्यासह मजेदारही असू शकते हे तिचे इन्स्टाग्राम अकौंटवरील रील्स पाहून लक्षात येते.
फिशिंग केवळ पुरुषांचे काम असू शकत नाही हे तिने सिद्ध करून दाखविले आहे. फ्लोरिडातील रेड ड्रम, चॅनल बास, रेडफिश, स्पॉट टेल, रेड बास हे मासे साराने आतापर्यंत पकडले आहेत. जे मासे पकडणे अवघड असते, त्यांचीच शिकार करणे साराला पसंत आहे. जॅक क्रीवेल सारख्या आक्रमक माशालाही साराने पकडले आहे. सारा मूळची पनामाची असून मॉडेल राहिली आहे.