पूजाविधी, आंबिलगाडय़ीं मिरवणूक, हलगा गजर, गुलालाया उधळणीने परिसर गजबजला, दुपारनंतर गावागावांमध्ये धूळवड कार्यक्रम
वार्ताहर /किणये
तालुक्यात होळीच्या सणाला मोठय़ा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे. काही गावांमध्ये सोमवारी रात्री तर बहुतांशी गावांमध्ये मंगळवारी सकाळी होळी उभारण्यात आली आहे. होळी उभारताना पारंपरिक हलगीचा गजर करण्यात आला. होळी रे होळी पुरणाची पोळी… असे होळीसमोर म्हणत बालचमुंनी आनंद लुटला. होळीची पूजा सुरू असताना बोंब मारण्यात येत होती. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येतो. ही परंपरा यावर्षीही जपण्यात आलेली आहे. आंबिलगाडय़ांची मिरवणूक, गुलालाची उधळण, हलगीचा गजर गावा-गावांमध्ये ऐकू येत होता. तालुक्यातील अनेक गावांमध्ये रविवारी व सोमवारी सकाळी होळीसाठी लागणारे सावरीचे व अन्य प्रकारचे लाकूड आणण्यात आले. सदर लाकूड आणल्यानंतर गावातील सुतारांच्या सहकार्याने सदर लाकडाला आकार देण्यात आला. त्यानंतर सोमवारी रात्री बैलगाडीतून होळीच्या आंबिलगाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. गावागावांमधील हक्कदार व पुजारी यांच्या हस्ते विधिवत पुजा करून आंबिल गाडय़ांना सुरुवात करण्यात आली. गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच आंबिलगाडा ओढण्याची कसरत खेळ काही गावातील तरुणांनी केला.
कडधान्योंही भिजवून वाटप
आंबील गाडय़ाची मिरवणूक काढताना तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये नाचणा पीक घेण्यात येते. या नाचण्याची आंबिल करण्यात आली होती. सदर आंबिल पूजेसाठी देण्यात आली आणि त्या आंबिलचे वाटपही सार्वजनिक ठिकाणी करण्यात आले. त्याचबरोबर हरभरा, वाटाणा, मसूर, तूर, गहू आधी पाच प्रकारचे कडधान्य भिजवून आंबील गाडय़ांच्या वेळेला तेही वाटप करण्यात आले. ही परंपरा फार पूर्वीपासूनची असून बहुतांशी गावांमध्ये ही परंपरा जपण्यात आलेली आहे. होळीसाठी लागणाऱया सावरीच्या व अन्यप्रकारच्या लाकडाला आंब्याच्या डोहांची आंबोती बांधण्यात आली होती. उंच असलेल्या होळीच्या टोकाला भगवे ध्वजही बांधण्यात आले होते. हलगीच्या गजरामध्ये गावागावातील ग्रामस्थांनी चव्हाटय़ाजवळ होळी उभारली. काही गावांमध्ये सोमवारी रात्री तर काही ठिकाणी मंगळवारी सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखविण्यात आला.
सुखमय जीवनासाठी होलिकोत्सव
होळी उभारण्यात आलेल्या बाजूलाच नारळाच्या झाडाच्या फांद्या व अन्य लाकडे होलिकोत्सव म्हणून पेटवण्याची परंपर ही आहे. दुष्ट प्रवृत्ती, गावावर येणारे संकट, रोगराई, वाईट विचार या होलिकोत्सवामध्ये जळून खाक व्हावेत. आणि गावकऱयांचे जीवन आनंदमय, सुखमय व्हावे, अशी होळीजवळ ग्रामस्थांनी प्रार्थना केली.
गावांमध्ये मनोरंजनो कार्यक्रम
होळीच्या सणानिमित्त तालुक्यात पाच दिवस वार पाळणूक करण्यात आले आहेत. ही वार पाळणुकीची परंपरा फार वर्षापासून आहे. पाच दिवस अनेक गावांमध्ये विविध धार्मिक, आध्यात्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी धुळवड साजरी करण्यात आली. किणये गावात सोमवारी रात्री होळी उभारण्यात आली. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. बहाद्दरवाडी, कर्ले या गावांमध्ये मंगळवारी सकाळी होळी उभारण्यात आली. कर्ले गावातील वेंगुर्ले गावातील होळी ही पश्चिम भागात सर्वाधिक उंच आहे. हंगरगा मंडोळी भागातही सणानिमित्त भक्तांची गावकऱयांची पूजेसाठी मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती. पिरनवाडी गावातील काही तरुणांनी व पंचमंडळींनी सोमवारीच खादरवाडी परिसरातील डोंगर भागातून होळीसाठी लागणारे लाकूड आणले होते. त्यानंतर गावात सोमवारी रात्री गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली होती. बेळगुंदी, राकसकोप, येळेबैल, सोनोली, जानेवाडी, मच्छे, हलगा, बस्तवाड आदींसह तालुक्याच्या सर्रास भागात पारंपरिक पद्धतीने होळीच्या सणाला सुरुवात करण्यात आली आहे.