सर्वपक्षीय व्यापक लढा उभारण्याचा निर्धार
सांगरूळ प्रतिनिधी
वाढत्या पशुखाद्य दरामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असून दूध संकलनात घट होत आहे. त्यातच गोकुळने गाय दूध दरात कपात केली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थकरवीर तालुक्यातील खटांगळे येथे गोकुळच्या दुध दर कपातीच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. गोकुळी दूध दर कपात मागे घेतली नाही, तर जिल्हाभर तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्ते व दूध उत्पादकांनी केला आहे.
यावेळी बोलताना करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी गोकुळ गायधर कपात केले आहेत. त्याचबरोबर इतर दूध संघापेक्षा म्हैस दूध दर कमी देऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. लवकरच त्या विरोधात संपूर्ण जिल्हाभर लढा उभा करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना यशवंत बँकेचे संचालक प्रा. टी एल पाटील यांनी गोकुळ दुध संघाने गाय दुध दरामध्ये जी अन्यायकारक दर कपात केलेली आहे त्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन उभे केले आहे .आंदोलन कोणत्याही गटा तटाचे नसुन दुध उत्पादकांच्या हक्कासाठी त्यांच्या घामाचे दाम मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचे आहे . त्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी बंधूंनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केले.
यावेळी माजी सरपंच तुकाराम लक्ष्मण पाटील ,बाजीराव पाटील, प्रल्हाद जांभळे, रवी पाटील,प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, रघुनाथ पाटील,अमर पाटील , दत्ता पाटील, विश्वास पाटील, ज्ञानदेव पाटील, धनाजी पाटील,पंकज पाटील, राजाराम पाटील, शंकर पाटील, रघुनाथ पाटील यांचे सह दूध उत्पादक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.