6 स्पीड गिअरबॉक्ससह स्पोर्ट्स बाईक 23 किलोमीटर मायलेज : किंमत 6.50 लाख रुपये
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अनेक टीझर उघड केल्यानंतर, होंडाने आपली सीबी750 हॉर्नेट ही गाडी बाजारात सादर केली आहे. यामध्ये हेंडाची स्पोर्ट्स बाईकची युरोपियन बाजारात विक्रीसाठी किंमत 6,999 युरो (अंदाजे 6.50 लाख रुपये) आहे. हेंडाने आपल्या आधीच्या स्पोर्ट्स बाईक सीबी650 च्या तुलनेत नवीन बाईकची किंमत 2.17 लाख रुपयांनी कमी केली आहे. त्याची किमत ही 8.67 लाख रुपये होती.
6-स्पीड गिअरबॉक्स
व्हि-qिट्वन इंजिन बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. सीबी750 चे वजन 15.2 लिटर इंधन टाकीसह 190 किलोग्रॅम आहे. ही नवी गाडी सुमारे 23 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल. आक्रमकपणे डिझाइन केलेल्या बाइकमध्ये एलईडी हेडलॅम्प, रुंद हँडलबार, स्प्लिट टाईप सीट, अपस्वेप्ट एक्झॉस्ट आणि एलईडी टेललॅम्पसह स्लिम टेल सेक्शन आहे. फुल कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असलेल्या बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्याय देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
डायमंड कट 17 इंचाची चाके
डायमंड-कट स्टील प्रेमसह सुसज्ज, बाईक 17-इंच ऍल्युमिनियम कास्ट व्हीलसह फिट आहे.
4 रायडर मोड उपलब्ध
रायडरच्या सुरक्षेसाठी पुढील आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक बसवले आहेत. यात डय़ुअल चॅनल एबीएस, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, व्हील कंट्रोल, राईड बाय वायर थ्रॉटल, 4 रायडर मोड, ट्रक्शन कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल आणि पर्यायी द्वि-दिशात्मक क्विकशिफ्टर मिळणार आहे.