Sweet Corn Bhaji : भजी म्हटल की तोंडाला पाणी सुटतं. कांदा भजी, मिरची भजी, बटाटा भजी, पालक भजी असे अनेक प्रकारचे भजी तुम्ही बनवले असतील पण आज आम्ही तुम्हाला स्वीट कॉर्न भजी कशी बनवायची याची टिप्स देणार आहोत. ट्राय करुन बघा तुम्हाला नक्की आवडेल.चला तर जाणून घेऊया स्वीट कॉर्न भज्जी रेसीपी.
साहित्य
स्वीट कॉर्न- 2 ते 3
कांदा-1
बेसन- 1 वाटी
तांदळाचे पीठ- अर्धा वाटी
मिरची- 4 ते 5
लाल तिखट- 1 चमचा
मीठ- चवीनुसार
खायचा सोडा- पाव चमचा
ओवा- पाव चमचा
हळद- पाव चमचा
कृती
सुरवातीला स्वीट कॉर्न पाण्यात शिजवून घ्या. त्यानंतर शिजेलेले स्वीट कॉर्न एका बाऊलमध्ये काढून थोडे गार करून घ्य़ा. त्यात आता बारीक चिरलेला कांदा, बेसन पीठ, तांदळाच पीठ, मिरची, मीठ, लाल तिखट, ओवा, हळद घालून मिक्स करा. गरज लागेल तेवढेच पाणी घालून मिक्स करा. आता कढईत तेल तापत ठेवा. यानंतर छोटे-छोटे गोळे तयार करून तळून घ्या. सॉसबरोबर सर्व्ह करा.