खानापूर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची सभा मणतुर्गा गावामध्ये उत्साहात पार पडली.
शुक्रवारी खानापूर तालुक्यातील मणतुर्गा गावामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचारदौरा झाला. यावेळी झालेल्या बैठकीत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी धनश्री सरदेसाई, माजी आमदार अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी, पंडित ओगले, रमेश पाटील, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.