अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली माहिती
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या आजारी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडियावर स्वतःची छायाचित्रे शेअर करत दिली आहे. या छायाचित्रांमध्ये ती हातांमध्ये ड्रिप लावलेल्या स्थितीत नो-मेकअप लुकमध्ये दिसून येत आहे. ही छायाचित्रे समोर आल्यावर तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.
एक दिवस किती काही बदलू शकतो, काही प्रेमळ डॉक्टर्स आणि आयव्ही फ्लुइड्सच्या तीन बॅग’ असे तिने कॅप्शनमध्ये नमूद पेले आहे. तर दुसऱया पोस्टमध्ये इलियानाने स्वतःची सेल्फी शेअर करत माझ्या प्रकृतीबद्दल जाणून घेणाऱया लोकांचे आभार मानते, हे प्रेम मिळवून मी स्वतःला सुदैवी समजत आहे, आता मी पूर्णपणे बरी असल्याचे सांगू इच्छिते असे म्हटले आहे.
इलियानाने 2012 साली दिग्दर्शक अनुराग बासू यांचा चित्रपट ‘बर्फी’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण पेले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी काम केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी इलियानाने अनेक पुरस्कार मिळाले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
इलियाना सध्या कॅटरिना कैफचा भाऊ सबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याचे समजते. दोघेही अनेकदा एकत्र दिसून येतात. इलियाना यापूर्वी ऑस्ट्रेलियन छायाचित्रकार एंड्रय़ू नीबोनला डेट करत होती, परंतु 2020 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला होता.