वृत्तसंस्था/ सॅन प्रॅन्सिस्को
अमेरिकेची माजी टॉप सिडेड टेनिसपटू 40 वर्षीय सेरेना विल्यम्सने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया सेरेनाने अमेरिकेन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली होती.
येथे एका खासगी उद्योग समुहाच्या समारंभावेळी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत आपण टेनिस क्षेत्रातून निवृत्त झालेली नसून नजीकच्या काळात पुनरागमन करणार असल्याची घोषणा सेरेनाने केली आहे. 9 ऑगस्ट रोजी सेरेनाने आपल्या निवृत्तीची घोषणा यापूर्वी केली होती. निवृत्तीनंतर आपण क्रीडा क्षेत्राशी संपर्कातच राहिन असे सूचित केले होते. टेनिस क्षेत्रामध्ये पुन्हा आपण प्रवेश करत असल्याचे सेरेनाने यावेळी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया महिला टेनिसपटूंमध्ये सेरेना दुसऱया स्थानावर आहे. अमेरिकेच्या मार्गारेट कोर्टने 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा विश्वविक्रम यापूर्वी नोंदविला असून तो अद्याप अबाधित आहे.