उत्रे / वार्ताहार
पन्हाळा तालुक्यातील कोतोली बाजारपेठेला जोडणार्या केर्ली ते नांदारी रस्त्याचे ए.डी.बी योजनेतून काम सध्या सुरू आहे. जागोजागी रस्त्याची खुदाई करण्यात आलीयं.तर काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूस क्राँक्रेट टाकण्यात आलयं.काँक्रेट पसलेल्या रस्तावर जागोजागी दगड गोटे,लाकूड जसेच्या तसे पडून आहे.मात्र संबंधित कंपनीने वाहतुकीस रस्ता बंद करण्याची गरज असताना देखील रस्ता सुरूच ठेवलायं तर वाहणधारक देखील धोका पत्करून या मार्गावरून वाहन चालवताना दिसत आहेत.आज पहाटेच्या दरम्यान पन्हाळा तालुक्यातील पिंपळे ते मानेवाडी खिंडीजवळ रस्ता वाहतुकीस सुरू असल्याच्या समजूतीतून पुनाळ येथील टेंंपो वारणेहून कोतोली,दिगवडे,तिरपण येथे दूध आणण्यासाठी निघाला होता. चालकाने नवीन करण्यात आलेला काँक्रेट रस्ता वाहतुकीस सुरू झाल्याच्या समजूतीतून मुख्य रस्ता सोडून चालकाने टेंपो नवीन रस्त्यावर चढवला काही अंतर गेल्यावर अचानक समोर लाकडाचा बुंधा दिसताच तो चुकविण्याच्या प्रयत्नात टेंपो रस्त्यावरील एका दगडावर आदळला दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने टेंपो थेट दहा फूट उंचीच्या भरावावरून खाली कोसळून पलटी झाला.चालक धनाजी पवार याने उडी मारल्याने त्याना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र टेंपोमध्ये असलेले वारणा दूध संघाचे सुपरवायझर अशोक पवार व वाहक सतीश बेनाडे हे दोघे जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सीपी.आर रूग्णालयात नेण्यात आले.आणखीन दोन फूट जरी टेंपो सरकला असता तर दहा फूट खोल असलेल्या शेतवडीत टेंपो कोसळला असता.पलटी झालेला टेंपो पाहिल्यानंतर टेंपोतील लोक दैव बल्वत्तर म्हणूनच बचावले अशी घटनास्थळी लोक चर्चा करीत होते.