In the Shiv Sena Thackeray group meeting, Mr. Tribute to Atu Fernandes
मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर शिवसैनिक आतू फर्नांडिस यांचे नुकतेच अकाली निधन झाले. बुधवारी मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीत दिवंगत आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला.
येथील लिलांजली सभागृहात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, नितीन वाळके, शिला गिरकर, दर्शना कासवकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दीपा शिंदे, शिल्पा खोत, निनाक्षी शिंदे, निना मुंबरकर, भाई कासवकर, सन्मेष परब, यशवंत गावकर, गौरव वेर्लेकर, किरण वाळके, सदा लुडबे, किशोर गावकर, नरेश हुले, महेश जावकर, मनोज मोंडकर, महेंद्र म्हाडगुत, बंड्या सरमळकर, महेश मेस्त्री, सिद्धेश मांजरेकर, अमेय देसाई यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण / प्रतिनिधी