Inamdar Shree Dev Rameshwar Devasthan’s Ramnavami festival begins!
आचरा प्रतिनिधी
रामनवमी उत्सवात रोज रात्री रंगणारा शाही थाटाचा पालखी सोहळा
आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास बुधवारी संस्थानी थाटात सुरुवात झाली असून हा उत्सव हनुमान जयंती पर्यंत चालणार आहे. बुधवारी दुपारी ‘ जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी ललकारी आसमंतात दुमदूमल्या नंतर वाजत गाजत श्रींच्या मंदिरात रघुपतीच्या मूर्तिचे आगमन झाले. त्यानंतर रयतेसाठी नूतन पंचांगाचे वाचन करण्यात आले. आगमननंतर पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मुर्तीची स्थापना झाली. रामनवमी उत्सवासाठी रामेश्वर मंदिर व आजुबाजूचा परिसर विद्युत रोषणाई ने सजविला आला आहे. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, कोल्हापुर आदी भागातून बँडपथकही दाखल झाले आहे.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या संस्थानी थाटात साजरा होणारा उत्सव म्हणून या रामनवमी उत्सवाकडे पाहिले जाते. दुपारी रघुपतीची आरती झाल्यावर भक्तगणांसाठी प्रसाद वितरीत करण्यात आला. सायंकाळी शाही थाटात ‘श्री ‘ च्या पाषाणाला न्हावन घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर श्री च्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली. तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपारीक थाटात श्री विष्णूची मूर्ती ,शृंगारलेली पालखीत विराजमान होऊन पालखी श्री रामेश्वर मंदिरा भोवती सोमसूञी प्रदक्षिणा करते. त्यानंतर सभाबुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे किर्तन असा दिनक्रम रोज ललिता पंचमी पर्यंत चालणार आहे.
रामनवमी उत्सवात विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी
बुधवार दि. २२ रोजी दुपारी रघुपती आरती, सायं. वा. माखन (पुजा) सायं सभामंडपातील पुराण वाचन रोज रात्री श्रींची पालखी सोहळा होणार आहे पालखी सोहळ्या उत्सवाचे किर्तनकार बुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे कीर्तन होणार असून पेटीसाथ श्री. आनंद लिंगायत तबला साथ श्री. अभिषेक भालेकर यांची लाभणार आहे
शुकवार दि. २४ मार्च रोजी सुधांशु सोमण, मिठबांव यांचे गायन, शनिवार दि. २५ रोजी सायं. ०५:३० वा. गायन कर्यक्रम गायक के अथर्व पिसे यांचे गायन, रविवार दि. २६ रोजी सकाळी 10 वाजता दिलीप ठाकूर यांचे गायन ऑर्गनसाथ श्री. भालचंद्र केसकर यांची असणार आहे.सायं. ०५:३० वा. शास्त्रीय गायन कार्यक्रम गायिका सौ. समिक्षा भोबे-काकोडकर गोवा यांचे होणार आहे. सोमवार दि. २७ मार्च रोजी गायक श्री. विनय वझे व सहकारी यांचे गायन, मंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी १०:०० वा व सायं. ०५:३० वा. गायन मैफिल गायक श्री. नितिन ढवळीकर यांची होणार असून बुधवार दि. २९ मार्च रोजी सकाळी १०:०० वा, बुधवार दि. २९ रोजी सायं. ०५:३० गायक पं. राम मराठे यांचे नातू गायन श्री. भाग्येश मराठे (ठाणे) यांची सांगित मैफिल होणार असून त्यात तबला साथ श्री. रामकृष्ण करंबेळकर, श्री. वरद सोहनी यांची राहणार आहे. गुरुवार दिनांक 30 रोजी रामनवमी उत्सव होणार असून रामजन्माचे किर्तन श्री. मिलंदबुवा कुळकर्णी करणार असून सायं. ०५:३० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे. शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी 10 वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे)यांचे गायन, शनिवार दि. ०१ एप्रिल रोजी रात्री ०९:३० वा. विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ आचरा यांचा कार्यक्रम आचरा आनंदरंग पांडुरंग पांडुरंग हा कार्यक्रम होणार असून कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, उदय पुजारे,विजय कदम यांचा सहभाग असणार आहे. बुधवारदि. ०५ रोजी रात्री ११:०० वा. हनुमान जयंती निमित्त श्री. रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक ‘गाव तसो चांगलो’ होणार आहे. गुरुवार दि. ०६ एप्रिल रोजी हनुमान जयंती, पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्माचे किर्तन बुवा श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी करणार आहेत. या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यकामांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.