केएससीए बेळगाव मैदानावर 9 मे पासून कॅम्पचे आयोजन
बेळगाव : केएससीएतर्फे 16 वर्षाखालील अकॅडमी व एनसीए कॅम्प 19 वर्षाखालील मुला मुलींसाठी होणाऱया शिबिराचे उद्घाटन मोठय़ा उत्साहात हुबळी येथील केएससीए मैदानावर करण्यात आले.
सदर एनसीए 19 वर्षाखालील मुलामुलींसाठी व 16 वर्षाखालील अकॅडमीक कॅम्पचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएससीए बेंगळूरचे सभासद तिलक नायडू, श्री राघवेंद्र, धारवाड विभागिय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विरण्णा सवदी, धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार, वसंत मुरडेश्वर व डी. के. श्रीनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कॅम्प हुबळी येथे सोमवार दि. 2 मे रोजी केएससीए मैदानावर सुरू झाले असून, 9 मे पासून बेळगावच्या केएससीए मैदानावर सुरू होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन तिलक नायडू यांनी यष्टीपूजन करून व श्रीफळ वाढवून केले.