वार्ताहर /हिंडलगा
अंगणवाड्या या लहान मुलांच्या भविष्यासाठी व शिक्षणाचे प्राथमिक धडे देण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. अंगणवाडीतूनच सर्व लहान मुले पुढील शैक्षणिक वाटचाल करत असतात. यासाठी अंगणवाडी शिक्षिकांनी लहान बालकांमध्ये प्रथमपासूनच शिक्षणाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यातूनच ती पुढील शिक्षण घेण्यासाठी तयार होतात, असे उद्गार हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांनी काढले.
हिंडलगा येथील क्रमांक दोन अंगणवाडीच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी नूतन अंगणवाडी इमारतीचे विधीपूर्वक पूजन झाल्यानंतर अध्यक्ष मनोळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रा.पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मनोळकर, सदस्या रेणू गावडे, सुमन राजगोळकर, उमा सोनवडेकर, अलका कित्तूर, संगीता पलंगे, आरती कडोलकर, चेतना अगसगेकर, परशुराम कुडचीकर, पंचायत सेक्रेटरी सुखदेव कोलकार, संतोष नाईक, ओंकार काकतकर, देवाप्पा जगताप, मीनाक्षी हित्तलमनी यांच्यासह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.