केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ः हंगामाच्या प्रारंभी शेतकऱयांना खूषखबर
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून शेतकऱयांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय 2022-23 या वर्षासाठी आहे. ‘सीसीईए’च्या निर्णयानुसार, 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये 92 रुपयांपासून 523 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. तिळाच्या दरात सर्वाधिक 523 रुपये प्रतिक्विंटल तर मका पिकासाठी सर्वात कमी 92 रुपये प्रतिक्विंटल दरवाढ केली आहे.
2022-23 साठी खरीप हंगामासाठी 14 पिकासाठी किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2022-23 साठी पिकाचा एमएसपी 2,040 रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, 2021-22 साठी पिकाचा एमएसपी 1,940 रुपये प्रतिक्विंटल होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकाच्या एमएसपीमध्ये 100 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. शेतकऱयांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
भात आणि बाजरीच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर तूर, उडीद आणि भुईमूगाच्या एमएसपीमध्ये प्रत्येकी 300 रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे. धानाच्या सामान्य श्रेणीच्या जातीचा एमएसपी मागील वषी 1,940 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,040 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. धानाच्या ‘अ’ दर्जाच्या जातीसाठी आधारभूत किंमत 1,960 रुपयांवरून 2,060 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
व्यावसायिक पिकांमध्ये, कापसाचा एमएसपी मागील वषीच्या 5,726 रुपये प्रतिक्विंटलवरून 6,080 रुपये करण्यात आला आहे, तर कापसाच्या मुख्य जातीसाठी एमएसपी 6,025 रुपयांवरून 6,380 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. कडधान्य प्रकारात, तुरीचा एमएसपी गेल्या वषीच्या 6,300 रुपयांवरून 6,600 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, तर मूगाचा एमएसपी 7,275 रुपयांवरून 7,755 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. उडदाचा एमएसपी 6,300 रुपयांवरून आता 6,600 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.
तेलबियांमध्ये, सोयाबीनचा एमएसपी गेल्या वषीच्या 3,950 रुपयांवरून 4,300 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे, तर सूर्यफूल बियाण्यासाठी, 6,015 रुपयांवरून समर्थन मूल्य 6,400 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. भुईमूग आधारभूत किंमत गतवषी 5,550 रुपये प्रतिक्विंटलवरून 5,850 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. नायजरसीडचा एमएसपी 7,287 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे, जो मागील वषी 6,930 रुपये प्रतिक्विंटल होता. मक्मयाचा एमएसपी गेल्यावषीच्या 1,870 रुपयांवरून 1,962 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, तर नाचणीसाठी, मागील वषी 3,377 रुपयांच्या तुलनेत आता 3,578 रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजरीच्या बाबतीत, एमएसपी 2,250 रुपयांवरून 2,350 प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. तर ज्वारीचा एमएसपी 2,970 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.
समाधानकारक पावसामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित
2022 चा नैर्त्रुत्य मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 99 टक्के सामान्य राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या तीन वर्षांत सामान्यपेक्षा चांगल्या पावसाने खरीप अन्नधान्य उत्पादनात सरासरी 2.8 टक्क्मयांनी वाढ केली आहे आणि त्यामुळे खरीप उत्पादनात 2.5 टक्के वाढ होऊ शकते, तर रब्बी उत्पादनात 1.5 टक्क्मयांनी वाढ झाली आहे.
खतांचा मुबलक साठा उपलब्ध
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी युरियासह अन्य खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. सद्यस्थितीतील युरियाचा साठा डिसेंबर 2022 पर्यंत पुरू शकतो. साहजिकच युरिया आयात करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमतीत घट झाली आहे. येत्या काळात या किंमती आणखी घसरण्याची शक्मयता आहे. सरकारने आधीच 16 लाख टन युरिया आयात केले असून ते पुढील 45 दिवसांत पाठवला जाईल, असेही मांडविया यांनी स्पष्ट केले.