29 लाख 59 हजार जनावरे, सर्वेक्षणानुसार आकडा स्पष्ट : बैल, मेंढय़ांच्या संख्येत घट
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः देशी गायींची संख्या वाढली आहे. पशुसंगोपन खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. गायी, म्हशी आणि शेळय़ांची संख्या वाढली असली तरी बैल आणि मेंढय़ांची संख्या लक्षणीय घटली आहे.
पशुसंगोपन आणि पशुवैद्यकीय सेवा खाते दर पाच वर्षांनी जनावरांची गणती करते. त्यानुसार मागील वषी झालेल्या 20 व्या जनावरांच्या गणतीत हा आकडा पुढे आला आहे. जिल्हय़ात 29 लाख 59 हजार 845 इतकी जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा, मेंढय़ा, कुत्रा, मांजर, गाढव, घोडा, डुक्कर आदींचा समावेश आहे.
पशु संगोपन खात्यामार्फत 2012 मध्ये झालेल्या 19 व्या गणतीनुसार जिल्हय़ात 19.20 लाख इतकी जनावरांची संख्या होती. त्यात आता 10 लाखांची भर पडली आहे. याबरोबरच शेजारील बागलकोट, विजापूर आणि धारवाड जिल्हय़ातही जनावरांची संख्या वाढली आहे. जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहन आणि विविध सोयी सुविधा मिळत असल्याने पशुपालकांची संख्या वाढली आहे. विशेषतः देशी गायींची 23 टक्क्मयांनी वाढ झाली असली तरी शेती कामासाठी लागणाऱया बैलांची संख्या 35 टक्क्मयांनी घटली आहे.
पशु संगोपन खात्याने केलेल्या पशुधन सर्वेक्षणानुसार बेळगाव, चिकोडी, बैलहोंगल विभागीय क्षेत्रात मागील चार वर्षात म्हशींची संख्या 8 लाख 44 हजार 171 झाली आहे. 19 व्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत म्हशींची संख्या 35 टक्क्मयांनी वाढली आहे. शिवाय रायबाग आणि अथणी तालुक्मयात देखील म्हशींची संख्या वाढली आहे. याबरोबरच सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्मयात म्हशींची संख्या 30 हजारावर मर्यादित आहे.
मागील 4 वर्षात गायी, म्हशी आणि बैलांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. देशी गायींच्या किमती 60 ते 90 हजार रुपयांपर्यंत आहेत. जातीवंत म्हशींच्या किमती 50 ते 90 हजार रुपयांपर्यंत आहेत. बैलजोडीची किंमत 60 ते 90 हजार रुपयांपर्यंत झाली आहे.
देशी गायी पाळणाऱयांच्या संख्येत वाढ
सर्वेक्षणानुसार जिल्हय़ात गायी, म्हशी आणि शेळय़ांची संख्या वाढली आहे. मात्र बैल व मेंढय़ांची संख्या लक्षणीय घटली आहे. मात्र दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत वाढ होत आहे. देशी गायींचे महत्त्व आणि जागृती झाल्यामुळे देशी गायी पाळणाऱयांची संख्या वाढली आहे.
– ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)