खानापूर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद लाभात आहे.
बेडगेरी.ता.खानापूर येथे खानापूर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार मा. विठ्ठल हलगेकर यांची प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी त्यांनी येथील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची मागणी आणि समस्या विषयी विचार विनिमय करून त्या सोडविण्याची ग्वाही दिली. खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी आपले बहुमोल मत भाजपलाच देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मा. रमेश पाटील,लक्ष्मण जांगरे मा.महेश गुरव,मा.पुंडलिक पाटील प्रमुख पदाधिकारी, बेडगेरी गावातील नागो कोलेकर, गोविंद पाटील,महादेव गुरव हे प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच तालुक्यातील तळावडे, गोल्याळी, मुंडवाड येथे देखील भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार मा. विठ्ठल हलगेकर यांची प्रचारसभा पार पडल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मा. रमेश पाटील,लक्ष्मण जांगरे व प्रमुख पदाधिकारी,तळावडे गावातील प्रमोद उशीनकर,धाकलू गावडे,अशोक कुलम, संदीप कुलम,खाचू कुलम, गोल्याळी गावातील महादेव गुरव, शिवाजी गुरव, विठ्ठल गुरव, रामा गुरव,तानाजी गुरव, पांडुरंग गुरव ,पुंडलिक गवस, हे प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबुराव देसाई,मा मारुती गावडे,विष्णू गावडे, नवळू बामणे,प्रमुख पदाधिकारी,मुंडवाड गावातील प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते