वार्ताहर /उसगांव
सर्वोदय शिक्षण संस्थेचे विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तुषार उसगांवकर, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन नाईक, सचिव गिरीश उसगांवकर, संस्थेचे सभासद गुरुदास गावडे, उल्हास गावडे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संदेश नाईक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशालता मिशाळ, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष गितांजली नाईक आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे तुषार उसगांवकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना तुषार उसगांवकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यविरांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटावे असे आवाहन केले. प्राचार्य संदेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर स्नेहा गोसावी व सैदन्या नाईक या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांतर्फे सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संतोषी उसगांवकर यांनी केले तर मुख्याध्यापिका आशालता मिशाळ यांनी आभार मानले.