वृत्तसंस्था/ हांगझोऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जु-जित्सु या क्रीडा प्रकारात भारताच्या तीन महिला स्पर्धकांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. महिलांच्या 52 किलो गटात अमिरातच्या अस्मा अलोसेनीने भारताच्या रोहिनी कलामचा 50-0, 57 किलो गटात दक्षिण कोरियाच्या गेयुमने भारताच्या अनुपमा स्वेनचा 12-0 तर 57 किलो गटात मंगोलियाच्या सोगखुने भारताच्या निकीता चौधरीचा 50-0 असा पराभव केला. आता भारताचे महेश्वर रे•ाr व अमरजित सिंग हे पुरुषांच्या 85 किलो वजन गटात शनिवारी होणाऱ्या लढतीत सहभागी होत आहेत. तसेच महिलांच्या 63 किलो गटात भारताची किरण कुमारीचा सामना शनिवारी होत आहे. या प्रकारात भारताने पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवला आहे.
यश नेन्सीचा पराभव
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वदौड जंपिंग वैयक्तिक प्रकारात भारताच्या यश नेन्सीला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. या क्रीडा प्रकारात सोदी अरेबियाच्या अब्दुल्ला वालीदने सुवर्ण तर ओमर अजिनबीने रौप्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारामध्ये भारताने यावेळी एक सुवर्णासह दोन पदकांची कमाई केली आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतीय स्पर्धकांनी एकूण 12 पदके मिळवली आहेत. त्यामध्ये तीन रौप्य, नऊ कास्यपदकांचा समावेश आहे.