वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताने भुतानचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली.
या सामन्यात भारतीय संघात हुकमी स्टायकर टी. गंगाते याने पूर्वार्धातच दोन गोल केले. त्यानंतर उत्तरार्धात कर्णधार व्ही. गुटे याने एक गोल नोंदविला. या स्पर्धेत आता भारताचा पुढील सामना नेपाळबरोबर शुक्रवारी खेळविला जाणार आहे.