ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये एका कारागृहात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात 14 जणांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत 24 कैदी कारागृहातून पसार झाले.
चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्मयूटरच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मेक्सिकोतील स्यूदाद जुआरेझ येथील कारागृहावर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला. यात 10 सुरक्षारक्षक आणि 4 कैद्यांचा समावेश आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अधिक वाचा : नोटाबंदीचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा
गोळीबारानंतर कारागृहातील कैद्यांमध्येही हाणामारी झाली. या हाणामारीत 13 कैदी गंभीर जखमी झाले. काही कैद्यांनी तुरूंगातील वस्तूंना आग लावली आणि कारागृहाच्या सुरक्षारक्षकांशी झटापट केली. या गोंधळाचा फायदा घेत 24 कैदी कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाले.