ऑनलाईन टीम / मुंबई :
आयएनएस ‘रणवीर’ युद्धनौकेवर मंगळवारी मुंबईनजीक भरसमुद्रात स्फोट झाला. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 11 जण जखमी आहेत. जखमींवर नौदल रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात येते.
आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते. त्याचवेळी युद्धनौकेच्या इंटर्नल कंम्पार्टमेंटमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर जे क्रू मेंबर होते, ते बाहेर येणाच्या प्रयत्नात होते, मात्र याच प्रयत्नादरम्यान तीन नौदल जवान शहीद झाले. स्फोट झाल्यानंतर काही मिनिटांतच तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, स्फोटामागचे कारण शोधण्यासाठी नौदलाने तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.