बेळगाव : आमदार राजू सेठ यांनी बुधवारी वीरभद्रनगर व फारुकिया कॉलनी या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांनी रस्ता, पाणी, गटारी यासह इतर समस्या आमदारांसमोर मांडल्या. नवीन प्रकल्प राबविण्यात येणार असून यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, सैनिकनगर या परिसराला भेटी देण्यात आल्या. सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असून, यासंदर्भात व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पिण्याचे पाणी कुठेही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन सेठ यांनी दिले. यावेळी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
Previous Articleअनगोळ येथील ‘त्या’रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
Next Article चंदगड पोलीस स्थानकात हजर राहून मांडले म्हणणे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.