सावंतवाडी/प्रतिनिधी-
इन्सुली शिवसेना उप विभाग प्रमुख पदी सचिन पालव यांची निवड झाली असून शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, नाना पेडणेकर, फ्रान्सिस रोड्रिक्स, विनायक सावंत, शब्बीर मणियार, तात्या वेंगुर्लेकर, विनायक सावंत, ठाकूर उपस्थित होते. इन्सुली विभागात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणाऱ्र असल्याचे पालव यांनी सांगितले. दरम्यान शिवसेनेतर्फे पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर करीत आहेत. गावागावातून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून कार्यकर्ते पदाधिकारी शाखेत आणून देत आहेत. तसेच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे एक ऑगस्टला सावंतवाडी येत असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.