वृत्तसंस्था/ दुबई
येथे होणाऱया आगामी इंटरनॅशनल लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱया कंरडकाचे अनावरण सोमवारी संयुक्त अरब अमिरात क्रिकेट मंडळाचे चेअरमन तसेच मंत्री शेख नेहायेन मबारक अल नेहायेन यांच्या हस्ते करण्यात आले.
दुबईमध्ये होणाऱया इंटरनॅशनल लिग टी-20 स्पर्धेतील विविध संघांचे प्रँचायझी या समारंभाला उपस्थित होते. अबुधाबी नाईट रायडर्स संघाचे मालक जय मेहता, डेझर्ट वायपर्स संघाचे मालक पॉल होगेट, दुबई कॅपिटल्सचे मालक किरण गांधी, गल्फ जॉयंटस्चे मालक प्रणव अदानी, मुंबई इंडियन अमिरातचे मालक निखील मेसवाणी, शारजा वॉरियर्सचे मालक राजेश शर्मा, झी इंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे पुनीत गोयंका त्याचप्रमाणे क्रिकेट क्षेत्रातील माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्रॅव्हो, वासिम अक्रम, सायमन डुल, रॉबिन उथप्पा आणि ब्रेट ली उपस्थित होते.
सदर स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही अमिरात क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशिशीर उस्मानी यांनी दिली आहे. विजेत्या संघाला देण्यात येणाऱया चषकावर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे. इंग्लंडमधील थॉमस लिटे यांनी या चषकाची बांधणी आकर्षकरित्या केली आहे. सदर स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण झी लिनियर वाहिनींवरून केले जाणार आहे.