सादरीकरणाची तारीख निश्चित ः फिचर्स, डिझाईन व किमतीबाबत खुलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज आयफोन निर्मितीमधील कंपनी म्हणून ओळख असणाऱया ऍपल कंपनीचा पुढील आवृत्तीमधील आयफोन 14 लवकरच सादर होणार असल्याचे संकेत आहेत. सदरचे सादरीकरण हे पुढील महिन्यातील 7 सप्टेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. काही माध्यमांच्या अहवालानुसार आयफोन 14 प्रो आणि आयफोन14 प्रो मॅक्स या मॉडेल्सचा यामध्ये समावेश होणार असल्याची माहिती आहे.
ऍपलच्या एकूण विक्रीत जवळपास 50 टक्के इतकी हिस्सेदारी ही आयफोनची असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयफोन 14 सोबत कंपनीने आणखी काही उत्पादने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. नवीन मॅक लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्युटर, ऍपल वॉच आणि आयपॅडही वेगवेगळय़ा किमतीत सादर करणार आहे. ऍपलचा आयफोन 14 हे एक उत्तम दर्जाचे मॉडेल असल्याची ओळख असून हा फोन आयफोन 13 शी मिळताजुळता राहणार आहे.
आयफोन 14 आवृत्तीबाबत
आयफोन 14 या मॉडेलची किमत ही 799 डॉलरपासून (जवळपास 64,000 रुपये) सुरु होणार असल्याचे संकेत आहेत. यांच्या किमती आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सच्या तुलनेत अधिक असणार आहेत.
फिचर्स ः
w आयफोन 14मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन राहणार
w 14 मॅक्समध्ये 6.7 इंच डिस्प्ले मिळणार
w सदरचे मॉडेल सहा कलरमध्ये उपलब्ध होणार
w 14 आवृत्तीमध्ये बॅटरीची क्षमता 3,279 एमएएच